मुंबई : सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागील घाणेकर मार्गात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक रस्ता खचून ६ ते ७ फूट खोल खड्डा पडला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. यामध्ये कोणी जखमी झालेले नाही. मात्र याचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसला. त्यामुळे प्रभादेवी परिसरामध्ये वाहतुकीच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर माहीम-माटुंगा आणि वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही वाहनांची एकच गर्दी झाली होती. स्थानिक पोलीस ठाण्यासह अग्निशमन दल, पालिका घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे अन्य मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रवक्ते धनंजय कुलक र्णी यांनी केले.
सिद्धिविनायक मंदिराजवळ रस्ता खचला
By admin | Updated: April 22, 2016 03:54 IST