Join us

विद्युत डीपीमुळे जिवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2015 22:33 IST

महाड तालुक्यातील खरवली येथील संस्कारधाम विद्यालयाशेजारी बसविण्यात आलेल्या विद्युत डीपी धोकादायक अवस्थेत आहेत.

बिरवाडी : महाड तालुक्यातील खरवली येथील संस्कारधाम विद्यालयाशेजारी बसविण्यात आलेल्या विद्युत डीपी धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे येथून ये - जा करणारे नागरिक, विद्यार्थी यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. खरवली आणि परिसरातील विद्युत पुरवठा करण्याकरिता बसविलेल्या विद्युत डीपीच्या वायर्सचे स्पार्किंग होवून आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, मात्र येथील सतर्क नागरिकांनी बोअरवेल चालू करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. मात्र धोकादायक वायरिंग मोकळ्याच असल्याने रात्रीच्या वेळी विद्युत दाब वाढल्याने स्पार्किंग होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता एमएसईबीचे बिरवाडी विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)