Join us  

रिक्षा २ रुपये तर टॅक्सीचे भाडे ४ रुपयांनी वाढणार? संघटना भाडेवाढीचा प्रस्ताव आज देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 2:28 PM

मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेतला जात असून, या प्रस्तावासंदर्भात मुंबई टॅक्सी मेन्स युनियन ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, मंगळवारी परिवहन विभागाच्या सचिवांना भाडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला जाईल.

मुंबई : इंधनाचे वाढते दर, देखभाल दुरुस्तीचा खर्च, अशी अनेक कारणे देत रिक्षा-टॅक्सी संघटना भाडे दरवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या सचिवांना सादर करणार आहेत. खटुआ समितीनुसार, भाडेवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असून, टॅक्सीकरिता ४ तर रिक्षाकरिता २ रुपये भाडेवाढीचा हा प्रस्ताव आहे.

मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेतला जात असून, या प्रस्तावासंदर्भात मुंबई टॅक्सी मेन्स युनियन ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, मंगळवारी परिवहन विभागाच्या सचिवांना भाडे दरवाढीचा प्रस्ताव सादर केला जाईल.

२०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात रिक्षाचे भाडे २१ वरून २३ रुपये करण्यात आले होते. टॅक्सीचे भाडे २५ रुपयावरून २८ करण्यात आले होते. भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला म्हणजे लगेच भाडेवाढ होते असे नाही. सगळ्या संघटनांसोबत चर्चा केली जाते. सचिव स्तरावर बैठका होतात. भाडेवाढ का मागितली आहे? याचा विचार केला जातो. सर्वानुमते मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाकडून याबाबत निर्णय घेतला जातो, अशी माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :टॅक्सीमुंबई