Join us

रिक्षा, टॅक्सी, एसटी आंदोलनाच्या पवित्र्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:29 IST

एसटी कामगार नेते हनुमंत ताटे आणि रिक्षा व टॅक्सी चालकांचे नेते शशांक राव यांची कृती समितीच्या अध्यक्ष व सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी, एसटी अशा विविध सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील सर्व चालक व कर्मचारी मंगळवारी, २६ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. केंद्र शासनाकडून मोटर वाहन कायद्यातील होणारे बदल कर्मचारी व चालकांविरोधात असल्याचा आरोप करत, विविध संघटनांनी एकत्रित येत कृती समितीची स्थापना केली आहे. या कृती समितीमध्ये आॅटो रिक्षा आणि टॅक्सीचे चालक व मालक, राज्यातील महापालिकांच्या अधिपत्याखालील परिवहनसेवेत काम करणारे कर्मचारी, एसटी कर्मचारी यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांचा समावेश आहे. एसटी कामगार नेते हनुमंत ताटे आणि रिक्षा व टॅक्सी चालकांचे नेते शशांक राव यांची कृती समितीच्या अध्यक्ष व सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासन मोटर वाहन कायद्यात प्रस्तावित बदल करणार असून, त्याचा विपरित परिणाम सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवर होणार आहे. एकंदरीत सार्वजनिक परिवहन व्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :टॅक्सीऑटो रिक्षा