ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. ११ - दिवसेंदिवस वाढत जाणा-या महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या त्रासात आता आणखी भर पडणार आहे. १ जूनपासून रिक्षा, टॅक्सीच्या मूळ भाड्यात सरासरी एक रुपयाची वाढ होणार असल्याने टॅक्सी व रिक्षाचा प्रवास महागणार आहे. एमएमआरडीएच्या बैठकीत भाडेवाढीचा हा निर्णय घेण्यात आला असून सीएनजी, पेट्रोल रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महाग होणार आहे.