Join us

विनयभंग प्रकरणी रिक्षाचालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:30 IST

एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार वर्सोव्यात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून, अंधेरी येथे राहते.

मुंबई : एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार वर्सोव्यात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. पीडित मुलगी ही दहा वर्षांची असून, अंधेरी येथे राहते.वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मुलगी घरात खेळता खेळता पडली. तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेण्यासाठी एक रिक्षा पकडली. ती रुग्णालयाजवळ पोहोचली तेव्हा डॉक्टर आहेत का? हे पाहण्यासाठी तिची आई रिक्षातून खाली उतरली.दरम्यान, रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी आईने पोलीस ठाण्यात आठवड्याभरापूर्वी तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, यात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली.