Join us

कळंबोलीत रिक्षा चालकांना मारहाण

By admin | Updated: April 4, 2015 05:39 IST

कळंबोली परिसरातील काही रिक्षा चालकांना अज्ञात जमावाने बेदम मारहाण केली. या संदर्भात कळंबोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तळोजा : कळंबोली परिसरातील काही रिक्षा चालकांना अज्ञात जमावाने बेदम मारहाण केली. या संदर्भात कळंबोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. कळंबोली - कामोठे सिग्नल येथे सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान अशोक दगडे (३५), कैलास जवळे (३४), दिलीप घनवट (४५), सुखदेव चौधरी (४०), शंकर जाधव (४५) यांना जबरी मारहाण झाली.दरम्यान, मारेक-यांना पकडण्यासाठी शनिवारी परिसरात रिक्षा बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळंबोलीत रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष दिलीप सावंत यांनी सांगितले. अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्यात याव्यात यासाठी शुक्रवारी रिक्षा संघटनेच्या वतीने वाहतूक विभाग व स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. या नंतर हा प्रकार घडला. (वार्ताहर)