मुंबई : नवी मुंबई विमानतळासाठी जेव्हीके, जीएमआर आणि फ्रान्सची एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्या समोर आल्या आहेत. या तीन कंपन्यांच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलला (आरएफपी) मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. केंद्र सरकारने नवी मुंबई विमानतळासाठी सुरक्षा मंजुरी अनिवार्य केली आहे. वरील तीनपैकी एकाच कंपनीला ही मंज़ुरी मिळाली असून अन्य दोन कंपन्यांना सशर्त मंजुरी मिळाली आहे. त्यांना आणखी दोन अटी पूर्ण केल्यानंतरच अंतिम मंजुरी मिळेल. नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण डिसेंबर २०१९ ला होईल. या विमानतळाची निविदा येत्या पाच महिन्यात काढण्यात येईल आणि नंतर महिनाभरात काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
नवी मुंबई विमानतळासाठी आरएफपीला मंजुरी
By admin | Updated: April 12, 2016 03:13 IST