Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुबाडले

By admin | Updated: July 13, 2014 23:01 IST

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या शक्ती ऑनलाइन लॉटरी दुकानात एका त्रिकुटाने शिरकाव करून रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून हजारो रुपये घेऊन रिक्षातून पोबारा केला

ठाणे - पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आलेल्या शक्ती ऑनलाइन लॉटरी दुकानात एका त्रिकुटाने शिरकाव करून रिव्हॉल्व्हर आणि तलवारीचा धाक दाखवून हजारो रुपये घेऊन रिक्षातून पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री हरिनिवास सर्कलजवळ घडली असून याप्रकरणी संजू बोदी यांनी तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच दुकानातील गल्ल्यातील आणि तेथे आलेल्या गिर्‍हाइकांच्या खिशातून अशी ३१ हजारांची रोकड जबरदस्तीने काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी) ................