Join us

रेवदंड्यातील दूरध्वनी केंद्र सुरु

By admin | Updated: November 21, 2014 23:33 IST

रेवदंडा परिसरातील दूरध्वनी केंद्र मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर बंद पडले होते. त्यातच केंद्राचे भाडे घरमालकाचे थकल्याने त्याला टाळे ठोकल्याने

रेवदंडा : रेवदंडा परिसरातील दूरध्वनी केंद्र मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर बंद पडले होते. त्यातच केंद्राचे भाडे घरमालकाचे थकल्याने त्याला टाळे ठोकल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले. सुमारे ३२ तास केंद्र बंद होते. या संदर्भात दूरध्वनी खात्याच्या अधिकारी वर्गाने रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या सहाय्याने टाळे निघाल्यावर केंद्र पूर्ववत सुरु झाले असल्याची माहिती अलिबाग - रायगडच्या उपमंडळातील ग्रामीण विभागाचे अभियंत्याने दिली. तब्बल ३२ तास दूरध्वनी सेवा बंद राहिल्याने परिसरातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली होती. (वार्ताहर)