यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातील काही क्षेत्रंतील योजनांचा घेण्यात आलेला आढावा़़़
वीज व ऊर्जा
देशभरात प्रत्येक घराला 24 तास वीजपुरवठा हे सरकारचे लक्ष्य़ ग्रामीण भागात 24 तास वीज मिळावी यासाठी दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर. यासाठी 5क्क् कोटींची तरतूद. थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी 1क्क् कोटींची तरतूद. अत्याधुनिक सौरऊर्जा प्रकल्पांसाठी 4क्क् कोटींची तरतूद. गॅस पाइपलाइन प्रोजेक्टसाठी 5क् हजार किमीच्या पाइपलाइनची आवश्यकता. पीपीपीतून उभारणार भांडवल़
बँकिंग, विमा :
विमा क्षेत्रतील एफडीआयची मर्यादा वाढवून 49 टक्क्यांर्पयत करण्याचा प्रस्ताव. बँकांचे शेअर जनतेत विकून पैसा जमविण्याचा प्रस्ताव. बँकांना अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी अधिक स्वायत्तता
उद्योग : सात औद्योगिक ‘स्मार्ट शहरे’ उभारणार. अमृतसर-कोलकाता कॉरिडॉरमध्ये ‘स्मार्ट शहरे’ बनणार. 1क्क् कोटींची तरतूद. ‘सेझ’मधील जागेचा पुरेपूर उपयोग करणार. इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणार. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी 1क् हजार कोटींची तरतूद. दिल्लीत हस्तकला अकादमी उभारणार. जम्मूच्या पश्मिना कलेच्या विकासासाठी 5क् कोटी रुपये. खाण क्षेत्रतील गुंतवणूक वाढविणार. देशाच्या विकासाला आवश्यक असेल तेथे थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय). रिअल इस्टेट क्षेत्नात मर्यादित स्वरूपात एफडीआय आणणार
एफडीआय :
देशाच्या विकासाला आवश्यक असेल तेथे थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय). उत्पादन क्षेत्नात एफडीआय आणण्यावर भर. नोक:या वाढविण्यासाठी उत्पादन क्षेत्नात एफडीआय आवश्यक. रिअल इस्टेट क्षेत्रत मर्यादित स्वरूपात एफडीआय आणणार. सरकारी बँकांत निर्गुतवणूक टप्प्याटप्प्याने करणार
कृषीक्षेत्र : नवे युरिया धोरण येणार. वेळेत कृषिकर्ज परतफेड करणा:या शेतक:यांना मिळणारी 3 टक्के व्याजाची सवलत जारी राहणार. सिंचन वाढविण्यासाठी प्रधानमंत्नी कृषी सिंचन योजनेसाठी
1 हजार कोटींची तरतूद. आंध प्रदेश, राजस्थानमध्ये कृषी विद्यापीठासाठी 2क्क् कोटी रुपयांची तरतूद. तंत्रज्ञानाधिष्ठित दुसरी हिरवी क्रांती आणणाऱ आधुनिक तंत्रज्ञानावर भर. भूमिहीन शेतक:यांना अर्थसाहाय्य तसेच 1 लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करून देणार.
सोने-चांदी तेजीत
ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून वाढलेली मागणी तसेच जागतिक पातळीवरील तेजी याचा लाभ मिळून सोने-चांदीचे भाव आज वाढले. सोने तोळ्यामागे 75 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 100 रुपयांनी महाग झाली. आज राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 28,200 रुपये तोळा होता.
तयार चांदीचे भाव 100 रुपयांच्या वाढीसह 45,200 रुपये किलो झाले. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचे भाव 100 रुपयांच्या वाढीसह 45,045 रुपये किलो झाले.