कर्जत : कर्जत शहरातील एका व्यापाऱ्याची पत्नी आपल्या बहिणीसह भाचीच्या लग्नाला मुंबईला गेल्या होत्या. लोकलमधून प्रवास करताना त्यांचे सोन्याचे दागिने, कपडे व रोख पंचवीस हजारांची रक्कम असलेली बॅग गाडीतून हरवली. मात्र सोळा दिवसांनी ती बॅग सर्व मुद्देमालासह परत मिळाली. त्यामुळे मुंबईतही अजून इमानदार लोक आहेत, याचा प्रत्यय या कुटुंबीयांना आला. शहरातील किराणा मालाचे व्यापारी ओटरमल जैन यांची पत्नी चंपाबाई आणि मेहुणी मंजुळा ओसवाल भाचीच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी कर्जतहून दुपारी १२.१च्या लोकलने मुंबईकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्याजवळील बॅग सीटखाली ठेवली. मात्र ठाणे स्थानक आल्यावर बॅग सीटखाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकाराने दोन्ही बहिणी पुरत्या भांबावून गेल्या. त्यांनी सीएसटी स्थानकातील पोलिसांकडे याप्रक्ररणी तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंजुळा ओसवाल मुंबईहून सकाळी दहाच्या लोकलने कर्जतला आल्या व कर्जतहून दुपारी सुटणाऱ्या त्याच डब्यात त्याच जागेवर बसून सहप्रवाशांकडे चौकशी केली. यावेळी काही महिला प्रवाशांनी त्यांचा व त्यांच्या भावाचा मोबाइल क्रमांक घेऊन काही माहिती मिळाल्यास कळवू, असे सांगितले. अवघ्या दोन दिवसांनी त्यांच्या भावाला एका महिलेचा फोन आला आणि तब्बल १६ दिवसांनी जैन त्यांना संपूर्ण ऐवजासह बॅग परत मिळाली.
दोन लाखांचा ऐवज मिळाला परत
By admin | Updated: December 24, 2014 22:27 IST