Join us

जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: October 27, 2014 22:34 IST

जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 834 पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा कारभार हा रामभरोसे बनला आहे.

आविष्कार देसाई - अलिबाग
जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 834 पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा कारभार हा रामभरोसे बनला आहे. आयएसओ प्रमाणित असलेल्या आणि राष्ट्रपतींनी गौरविलेल्या या जिल्हा परिषदेच्या बिकट अवस्थेमुळे विकासकामांना चांगलीच खीळ बसली आहे. ही आकडेवारी ऑगस्ट 2क्14 अखेरची असली, तरी सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली होती. आचारसंहिता अद्याप सुरु असल्याने रिक्त पदे भरण्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे सूत्रंनी सांगितले. 
जिल्हा परिषदेमध्ये 62 सदस्य आहेत, परंतु प्रशासनाचा म्होरक्या असणारे मुख्यकार्यकारी अधिकारी हे पद रिक्त आहे, त्याचप्रमाणो कार्यकारी अभियंता (बांधकाम), कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), प्राथमिक आणि माध्यामिक शिक्षणाधिका:यांचेही प्रत्येकी एक पद रिक्त असून जिल्हा परिषदेला प्रकल्प संचालकही मिळालेला नाही. वर्ग-3 आणि 4 ची मंजूर पदे 11 हजार 851 पैकी 11 हजार 24 एवढी भरलेली असून उर्वरित 827 पदे  रिक्त आहेत. काही पदे ही स्पर्धा परीक्षेच्या निकालामुळे रखडली आहेत, तर काही पदोन्नती आदेश, तसेच कार्यवाहीवर अडली आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता परिवर्तन झाले असून शेकाप आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांनी रिक्त पदे भरण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा अधिभार ज्यांच्यावर आहे, ते अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
प्रशासन विभाग सरळ सेवा (मंजूर)(भरलेली)  (रिक्त)   पदोन्नती (मंजूर)(भरलेली)(रिक्त)
सामान्य प्रशासन विभाग 398 367 35 288 26325  
अर्थ विभाग 46 4क्6   1क्6 99
ग्रामपंचायत विभाग571 531 4क् 159 143 16 
आरोग्य विभाग616 551 65 199166 33
कृषी विभाग23 2क्3 37 32
ग्रामीण पाणी पुरवठा 2क् 19 1 2क् 17
बांधकाम विभाग 15289 63 56 32 24 
पशुसंवर्धन विभाग 71 66 5 25 16
शिक्षण विभाग (प्राथमिक) 8क्27 7654 337 425 369 56 
महिला व बाल कल्याण 1क्8 98 1क् 1 1-
एकूण वर्ग 453949क् 49 7259 13