Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीटर मुखर्जीला हवा गोपनीय साक्षीदाराचा जबाब

By admin | Updated: July 5, 2016 02:00 IST

शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने सील लिफाफ्यात विशेष सीबीआय न्यायालयात सादर केलेल्या गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीची प्रत मिळावी, यासाठी पीटर मुखर्जी याने विशेष न्यायालयात अर्ज

- शीना बोरा हत्या प्रकरण

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने सील लिफाफ्यात विशेष सीबीआय न्यायालयात सादर केलेल्या गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीची प्रत मिळावी, यासाठी पीटर मुखर्जी याने विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने सीबीआयला ७ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआयने पुरवणी आरोपपत्र फेब्रुवारीमध्ये दाखल केले. या आरोपपत्राबरोबर सीबीआयने एका अनामिक साक्षीदाराच्या जबाबाची प्रत सील लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केली. तपास सुरू असल्याचे कारण देत सीबीआयने साक्ष कोणाची आहे, हे सांगण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)