Join us  

विरोधकांच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या, नितीन गडकरी यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 5:55 AM

भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विशेष प्रतिनिधीमुंबई  - भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी मुंबईत केले.भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गाव, गरीब, किसान यांचा विकास करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, भाजपाला देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिकयश मिळाले आहे. विरोधकांच्या प्रचाराला जनतेने दाद दिलेली नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी विचलित न होता विकासाच्या अजेंड्यावर ठाम राहावे.भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांचेही भाषण झाले. पहिल्या सत्रात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजकीय ठराव मांडला. भाजपाच्या राज्य सरकारला येत्या३१ आॅक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत असून भाजपा सरकारने या कालावधीत विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे या ठरावात अभिनंदन करण्यात आले. यासंदर्भात या वेळी करण्यात आलेल्या ठरावाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.

टॅग्स :नितीन गडकरीबातम्या