Join us

जनभावनेचा आदर प्रार्थनास्थळे हटवताना करू

By admin | Updated: January 12, 2015 02:09 IST

पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्म, पंथांची अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली

मुंबई : पदपथ व रस्त्याच्या कडेला असलेली विविध धर्म, पंथांची अनधिकृत प्रार्थनास्थळे हटविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. २००९नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करतानाच नागरिकांच्या भावनांचा पूर्ण विचार केला जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. जी धार्मिक स्थळे रस्त्याच्या मधोमध आहेत, त्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याचाही विचार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)