Join us

सर्व जाती-धर्माचा आदर करा - हायकोर्ट

By admin | Updated: October 19, 2014 02:26 IST

लोकशाही प्रणीत समाजात प्रत्येकाने सर्व जाती-धर्माचा आदर करायला हवा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

मुंबई : लोकशाही प्रणीत समाजात प्रत्येकाने सर्व जाती-धर्माचा आदर करायला हवा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. स्वत:ची जात, धर्म व समाजाबाबत लिखाण  अथवा काम करण्यास कोणतेही र्निबध नाहीत. पण तसे करताना कायद्याच्या चौकटीत राहून अन्य जाती-धर्माचा व समाजाचा अवमान होणार नाही वा दोन समाजांत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
 साहित्यिक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने हा सल्ला दिला आहे. खेडेकर यांनी त्यांच्या दोन पुस्तकांत दोन समाजांबाबत लिखाण केले आहे. हे लिखाण दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे; तसेच महिलांचा अवमान करणारे आहे, अशी तक्रार सिंधुदुर्गच्या देवगडमधील स्वाती जितेंद्र बापट यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. खेडेकर व प्रकाशक किशोर साहेबराव कडू यांच्याविरोधात ही तक्रार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून खेडेकर व कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
2क्12मध्ये ही तक्रार नोंदवली. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने कारवाई करायला हवी होती. मात्र सरकारने कारवाई केली नाही हे धक्कादायक आहे, असेदेखील न्यायालयाने नमूद केले. पण खेडेकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून आपला महिलांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे न्यायालयासमोर स्पष्ट केले. तर असे लिखाण प्रकाशित केल्याबद्दल कडू यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र खेडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत समाजासंदर्भात केलेल्या लिखाणाबाबत काहीच नमूद केले नसल्याचा ठपका न्यायालयाने 
ठेवला.  (प्रतिनिधी)