मुंबई : दी चिल्ड्रेन्स एड सोसायटीच्या मुंबईतील बालसुधारगृहांच्या दयनीय अवस्थेबद्दल ‘लोकमत’ने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेचे पडसाद विधान परिषदेत उमटले आहेत. विधान परिषद आमदार भाई जगताप यांनी परिषदेत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली आहे. त्यावर सभापतींनी या प्रश्नी परिषदेत निवेदन करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्र्यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)आमदार भाई जगताप यांची स्थगन प्रस्तावाची सूचना-समाजातील अनाथ, वंचित, गतिमंद आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृहे आहेत. या बालसुधारगृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून त्यांना शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने चिल्ड्रन सोसायटीला बाहेरून भीक मागण्याची वेळ आली आहे. तसेच बालगृहातील मुलांची व्यथा २० ते २५ जुलै या कालावधीत ‘लोकमत’ने मांडल्यानंतर याचे पडसाद विधान परिषदेत उमटले आहेत.-आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत २२ जुलैला स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. या प्रस्तावावर शासनाने पाच दिवसांच्या आतमध्ये निवेदन करण्याचे निर्देश सभापतींनी दिले आहेत. त्यानुसार महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्र्यांना विधान परिषदेत निवेदन करावे लागणार आहे.
बालसुधारगृहांच्या दुर्दशेचे विधान परिषदेत पडसाद
By admin | Updated: July 28, 2015 01:29 IST