Join us

क्वॉरंटाइन होण्याआधीच रहिवासी घराला टाळे लावून झाले पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:41 IST

विक्रोळी येथील प्रकार : परिसरात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. टागोरनगरच्या ग्रुप नंबर १ येथील अशोकनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. परंतु रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाइन करण्याआधीच त्या नागरिकांनी त्यांच्या घराला टाळे लावून पळ काढला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रुग्णालयातून अथवा क्वॉरंटाइन सेंटरमधून कोरोनाबाधित व संशयित रुग्ण पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु विक्रोळी येथे क्वॉरंटाइन होण्याच्या भीतीनेच नागरिकांनी पळ काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अशोकनगर परिसरातील नागरिक घराला टाळे लावून नक्की कुठे पळून गेलेत, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.