Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरला शिवीगाळ

By admin | Updated: October 11, 2015 01:57 IST

व्ही.एन. देसाई रुग्णालयात डॉक्टरला शिवीगाळ केल्याची घटना ताजी असतानाच सायन रुग्णालयात या घटनेची पुनरावृत्ती झाली. रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १च्या सुमारास

मुंबई : व्ही.एन. देसाई रुग्णालयात डॉक्टरला शिवीगाळ केल्याची घटना ताजी असतानाच सायन रुग्णालयात या घटनेची पुनरावृत्ती झाली. रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १च्या सुमारास प्लॅस्टिक सर्जरी विभागातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकाने शिवीगाळ केली असून, सुरक्षारक्षकांवर हात उचलला. यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. शुक्रवारी मध्यरात्री १च्या सुमारास अपघात झालेला एक रुग्ण सायन रुग्णालयात आला. त्या वेळी आॅपरेशन थिएटरमध्ये एक शस्त्रक्रिया सुरू होती. आणलेल्या नवीन रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती. पण, त्याच्या जिवाला धोका नव्हता. तर, एक शस्त्रक्रिया सुरू असल्यामुळे सर्वच डॉक्टर आणि कर्मचारी तिथे काम करत होते. एका निवासी डॉक्टरने आलेल्या नव्या रुग्णाला थोडा वेळ थांबा, एक शस्त्रक्रिया सुरू आहे. ती संपल्यावर तत्काळ तुमच्या रुग्णाला घेतो असे सांगितले. तरीही रुग्णाचे नातेवाईक ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी डॉक्टरना शिवीगाळ सुरू केली. (प्रतिनिधी)