Join us

निवडणूक कार्यक्रमात पुन्हा फेरबदल

By admin | Updated: March 31, 2015 22:24 IST

जुलै २०१५ मध्ये मुदत संपत असलेल्या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने त्या सर्व सहा

कर्जत : जुलै २०१५ मध्ये मुदत संपत असलेल्या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने त्या सर्व सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि दोन ग्रामपंचायतीमधील तीन जागांसाठी पोटनिवडणुकांची अधिसूचना कर्जत तहसीलदारांनी जारी केली आहे. त्यामुळे मंगळवारपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.कोल्हारे आणि जिते या ग्रामपंचायतीसोबतच सालोख तर्फे, वरेडी, पोशीर, पोटल, हुमगाव या सहा ग्रामपंचायती आणि उमरोली ग्रामपंचायतीमधील दोन जागांसाठी आणि पाषाणे ग्रामपंचायतीमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. उमरोलीमध्ये मतदारांनी निवडणूक प्रक्रि येवर बहिष्कार टाकला होता, तर पाषाणेमधील सदस्यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे. कोल्हारे आणि जिते येथे निवडणूक अपेक्षित आहे. मात्र हुमगाव, पोशीर, सालोख तर्फे वरेडी आणि पोटल या ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबरपर्यंत संपत असल्याने त्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निर्णय अधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी रात्री उशिरा सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या सर्व ठिकाणी मुदत ३१ मार्चपासून ७ एप्रिल पर्यंत असून सकाळी अकरा ते तीन या वेळेत नामांकन अर्ज कर्जत तहसील कार्यालयामध्ये भरता येईल. (वार्ताहर)