Join us  

तलावांमध्ये सहा महिन्यांचा जलसाठा झाला जमा; मुंबईकरांची चिंता होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 2:23 AM

तूर्त तरी पाणीकपात राहील

मुंबई : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने मुंबईकरांना थोडा दिलासा दिला आहे. तलाव क्षेत्रात आता सात लाख ५१ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. हा जलसाठा पुढील १९७ दिवस म्हणजे साडेसहा महिने मुंबईची तहान भागवू शकेल. मात्र तलावांमध्ये आणखी ४८ टक्के जलसाठा कमी असल्याने २० टक्के पाणीकपात अशीच सुरू राहणार आहे.मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गतवर्षीच्या तुलनेत तलावांमध्ये यंदा निम्म्याहून कमी जलसाठा आहे. त्यामुळे ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.दरम्यान, आॅगस्ट महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात चांगला जोर धरला आहे. परिणामी, एका आठवड्यात तलावांची पातळी १५ टक्क्यांनी वाढली आहे.वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव कमाल किमान उपयुक्त सध्यासाठा (दशलक्ष)मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ७७९९६ १५६.७४तानसा १२८.६३ ११८.८७ ७०९६३ १२४.३७विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.२७तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.२२अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ७५७२६ ५९८.४८भातसा १४२.०७ १०४.९० ३८५७७८ १२८.४४मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १०५५९९ २६९.०१तलावांमध्ये जलसाठा१० आॅगस्ट रोजी (दशलक्ष लीटर)वर्ष जलसाठा टक्के२०२० ७५१८०६ ५१.९४२०१९ १३२३४८२ ९१.४४२०१८ १२४१३२९ ८५.७९