Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: May 31, 2015 22:22 IST

तालुक्यातील ग्रामपंचायतींंंचे निवडणूक आरक्षण तहसीलदार कार्यालयात महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली

पोलादपूर: तालुक्यातील ग्रामपंचायतींंंचे निवडणूक आरक्षण तहसीलदार कार्यालयात महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार के. डी. नाडेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी जाहीर झाले.अनुसूचित जमातीसाठी पैठण ग्रामपंचायत सर्वसाधारण, सडवली व वाकण महिला राखीव, अनुसूचित जाती कोंढवी सर्वसाधारण तर पार्ले व दिवील महिलांसाठी राखीव तसेच ओबीसी ना. मा. प्रवर्ग गोवेले, धारवली, महाळुंगे, सवाद, पळचिल, देवपूर या सहा ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी राखीव असून तुर्भे बदु्रक, देवळे, चरई, तुर्भे खु., काटेतळी, परसुले, कापडे ब्रु., पोलादपूर, कुडपण ब्रु., वझरवाडी या एकूण ११ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. उमरठ, कापडे खु., गोळेगणी, कालवली, मोरसडे, धामणदेवी, मोरगिरी, ओंबळी, बोरावळे, महालगुर, कोतवाल खु., कोतवाल बु्र., भोगाव, तुर्भे खोडा या एकूण १४ ग्रामपंचायती सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, भाजपाचे अनंत माने आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)