Join us

वसई-विरार मनपाच्या ११५ जागांचे आरक्षण

By admin | Updated: March 30, 2015 23:46 IST

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी आज विरार येथील सांस्कृतीक भवन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.

वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी आज विरार येथील सांस्कृतीक भवन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये मागासवर्ग पुरूष प्रवर्ग - १५, मागासवर्ग महिला प्रवर्ग - १६, महिला सर्वसाधारण - ३६, अनु. जाती - २, अनु. जाती महिला - ३, अनु. जमाती - २, अनु. जमाती महिला - ३, व सर्वसाधारण गट - ३८ असे आरक्षण झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना यंदा निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे. परिणामी अनेकांची संस्थाने खालसा झाली आहेत. त्यापैकी काहीजण पत्नीला तिकीट मिळवून देण्याच्या खटपटीत आहेत.