Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन भवन कोरोनाग्रस्तांसाठी मोकळे करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाग्रस्तांसाठी जागेचा अभाव दिसून येत असून, प्रसंगी रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून देण्याची ग्वाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाग्रस्तांसाठी जागेचा अभाव दिसून येत असून, प्रसंगी रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून देण्याची ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी नुकतीच दिली.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून औषध, ऑक्सिजन बेड आणि जागेचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. देशासह महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान वाढले असून जीवितहानी होत आहे. समाज मृत्यूच्या दाढेत अडकला असून, प्रसंगी फोर्ट येथील रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून देण्याची ग्वाही कनिष्क कांबळे यांनी दिली.

अशा कठीण प्रसंगी मोठमोठ्या व्यावसायिक लोकांनी मदत करावी, शिवाय सर्व मंदिरे शासनाने ताब्यात घेऊन तो निधी माणूस वाचवण्यासाठी वापरावा, असे मत राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी मांडले.

...................................................