Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा पथकांचा अहवाल तयार

By admin | Updated: July 11, 2015 02:14 IST

गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी गठीत केलेल्या समितीने तयार केलेला अहवाल सोमवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोमवारी देण्यात येणार आहे

मुंबई : गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्यासाठी गठीत केलेल्या समितीने तयार केलेला अहवाल सोमवारी क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोमवारी देण्यात येणार आहे. त्यानंतर शिफारशीचा अंतिम अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आजच्या बैठकीनंतर दिली.मुंबईसह राज्यातील गोविंदांना खेळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी विधिमंडळात झाल्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीची बैठकदेखील पार पडली. या बैठकीला आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह गोविंदा पथकातील तज्ज्ञांचीही उपस्थिती होती. क्रीडा खात्याने तयार केलेल्या मसुद्यावर शुक्रवारी सुमारे दोन तास चर्चा झाली, सचिवालय जिमखाना येथे ही बैठक पार पडली.याविषयी आमदार अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले की, या चर्चेअंती चांगल्या नियमांचे प्रारूप तयार झाले आहे. हेतू उद्देश आणि सर्वसाधारण चर्चा पूर्ण झाली आहे. खेळांच्या गुणांकनाबाबत चर्चा अजून बाकी आहे. ती पूर्ण करून समितीचा अहवाल सोमवारी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांना समिती सादर करेल. त्यानंतर सरकार आपला निर्णय जाहीर करेल. (प्रतिनिधी)