Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिठ्ठीत नावे असलेल्यांवर गुन्हे नोंदवा - मुख्यमंत्री

By admin | Updated: October 12, 2015 05:35 IST

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावे असतील त्यांच्याविरोधात

मुंबई : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावे असतील त्यांच्याविरोधात तपासाअंती कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना दिले. परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी रात्री ठाण्याचे पालकमंत्री आ. एकनाथ शिंदे, आ. प्रताप सरनाईक, आ. मंगलप्रभात लोढा आणि बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. चिठ्ठीत नावे असलेल्या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठी वाचून दिले.