Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेच्या एकाही शिक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारपर्यंत पालिकेच्या एकूण ११६१ पालिका शिक्षकांपैकी ४१२ शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकाही शिक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. दरम्यान, पालिका आयुक्तांच्या ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच्या आदेशानंतर शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांना स्थगिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.