Join us

रिपाइंचा 28 तारखेला इशारा मोर्चा

By admin | Updated: November 13, 2014 01:15 IST

पाथर्डी हत्याकांड आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकप्रश्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर इशारा मोर्चा काढणार आहे.

मुंबई : पाथर्डी हत्याकांड आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकप्रश्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) 28 नोव्हेंबरला आझाद मैदानावर इशारा मोर्चा काढणार आहे. इंदू मिलच्या जागेवर उभारणा:या राष्ट्रीय स्मारकाच्या कामास 5 डिसेंबरपूर्वी सुरुवात करावी आणि पाथर्डी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशा प्रमुख मागण्या रिपाइंने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केल्या आहेत.
रामदास आठवले म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यास दिरंगाई होत आहे. तरी 5 डिसेंबर्पयत सरकारने कामास सुरुवात केली नाही, तर 6 डिसेंबरला रिपाइं इंदू मिलचा ताबा घेईल. राज्याच्या अर्थसंकल्पात आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 1क्क् कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार असल्याचे आठवले यांनी 
सांगितले. (प्रतिनिधी)
 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत मदत केल्याबद्दल रिपाइंला केंद्रात एक मंत्रिपद देण्याचे लेखी आश्वासन दिल्याचा दावा आठवले यांनी केला आहे. मात्र भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. उद्धव हे दिलेला शब्द पाळतात, अशा शब्दांत आठवले यांनी यावेळी भाजपाला चिमटा काढला.