Join us

बोरीवली मंडई येथील बसमार्ग बदला!

By admin | Updated: May 11, 2014 22:54 IST

बोरीवली पि›मेकडील स्थानकाजवळ असलेल्या भाजी मंडई मार्गाहून गेल्या काही महिन्यांपासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.बोरीवली एस.व्ही.रोड ते जलाराम चौक पर्यंत लाखो रुपये खर्च करुन नवीन सिंमेट कॉंंक्रीटचा रस्ता बांधण्यात आला आहे.मात्र या रस्त्याचा वापर सर्वात जास्त भाजी,फळविक्रेते व फेरीवाले करतात.

मुंबई : बोरीवली पि›मेकडील स्थानकाजवळ असलेल्या भाजी मंडई मार्गाहून गेल्या काही महिन्यांपासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.बोरीवली एस.व्ही.रोड ते जलाराम चौक पर्यंत लाखो रुपये खर्च करुन नवीन सिंमेट कॉंंक्रीटचा रस्ता बांधण्यात आला आहे. मात्र या रस्त्याचा वापर सर्वात जास्त भाजी, फळविक्रेते व फेरीवाले करतात. रस्त्यावरच भाजी, फळ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्याने पादचार्‍यांना चालायलाही जागा शिल्लक राहिली नाही. त्यात बेस्ट बस सुरु केल्याने आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर साधे पायी चालणेही पादचार्‍यांना जिकरीचे जात आहे. येथील बसथांब्यावर भाजी, फळे, फुले विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक राहत नाही. येथील मार्गावर बेस्ट बस आली की प्रवाशांना कशीबशी वाट काढत बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागते. बससाठी पर्यायी नवीन मार्ग तयार करण्यात आला. मात्र बस व्यवस्थित जाण्यासाठी कोणतीच सुविधा केली नाही. या मार्गावरुन बस काढतानाही मोठी कसरत काढत बस पुढे न्यावी लागते, असे बेस्ट बसचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.दरम्यान, भाजी मंडई मार्गाच्या शेजारी आर-मध्य पालिका कार्यालय आहे. परंतू पालिका अधिकारी या अतिक्रमणावर कारवाई करत नाही, असा आरोप बोरीवलीकरांनी केला आहे. परिणामी जनतेसाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यावर लोकांना पायी चालता यावे; याकरिता बसमार्ग बदलण्यात यावा, असे बोरीवलीकरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)