Join us  

महाआघाडी सरकारमध्येही रिक्त पदांची ‘पुनरावृत्ती’, सचिवापासून एसीबी, क्राइम, एटीएसची पदे रिक्तच

By प्रशांत माने | Published: July 06, 2020 7:19 AM

पोलीस महासंचालकानंतर ज्येष्ठ अधिकाºयांचे समजले जाणारे लाचलुचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक, मुंबईच्या आयुक्तांनंतर आकर्षणाचे मानले जाणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राइम) सहआयुक्त, एटीएस व नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक आणि वैधमापन शास्त्र विभागातील नियंत्रक ही महत्त्वाची पदे रिक्तच आहेत.

- जमीर काझीमुंबई : राज्यात सत्तांतर होऊन सात महिने उलटले तरी गृह विभागाच्या कार्यपद्धतीत फरक पडलेला नाही. पोलीस दलातील महत्त्वाची पदे रिक्त ठेवायची आणि त्यावर सोयीनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची, ही मागील सरकारची परंपरा महाविकास आघाडीमध्येही कायम आहे. अप्पर मुख्य सचिवासह (गृह) खात्याच्या कार्यपद्धतीला निर्णायक ठरणाºया ‘सुपर कॉप्स’च्या पाच पदांना पूर्णवेळ वाली नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्याचा कार्यभार चालविला जात आहे.पोलीस महासंचालकानंतर ज्येष्ठ अधिकाºयांचे समजले जाणारे लाचलुचपत विभागाचे (एसीबी) महासंचालक, मुंबईच्या आयुक्तांनंतर आकर्षणाचे मानले जाणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे (क्राइम) सहआयुक्त, एटीएस व नागपूरच्या नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक आणि वैधमापन शास्त्र विभागातील नियंत्रक ही महत्त्वाची पदे रिक्तच आहेत. एकीकडे अधिकारी नियुक्तीविना ‘वेटिंग’वर असताना ही पदे न भरण्यामागील कारण काय, असा सवाल पोलीस वर्तुळातून केला जात आहे. संजयकुमार यांची ३० जूनला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. गृहनिर्माण विभागाचे प्रमुख असलेल्या संजयकुमार यांच्याकडे दीड वर्ष गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे आहे. एसीबी महासंचालकपद चार महिने रिक्त आहे. २९ फेब्रुवारीला मुंबईच्या आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती झाल्यानंतर अप्पर महासंचालक बी.के. सिंग यांच्याकडे हा पदभार आहे. अनेक डीजी या पदाच्या नियुक्तीसाठी इच्छुक आहेत. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.मुंबईचे क्राइम ब्रँचचे प्रमुख संतोष रस्तोगी दिल्लीत प्रतिनियुक्तीला गेल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून त्याचा पदभार कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख विनय चोबे यांच्याकडे आहे. अडीच महिन्यांपूर्वी त्यांना अप्पर महासंचालकपदी पदोन्नती दिली असून ते पोस्टिंंगच्या प्रतीक्षेत आहेत. वैधमापन शास्त्र विभागातील नियंत्रकाचे पद गेल्या वर्षीच्या २० सप्टेंबरपासून रिक्त असून अतिरिक्त कार्यभार गृह विभागातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याकडे आहे. एटीएसचे आयजी पद गेल्या वर्षीच्या २० फेब्रुवारीपासून रिक्त आहे. तर नक्षलविरोधी अभियानचे महानिरीक्षकपद गेल्या वर्षीच्या २४ जूनपासून भरलेले नाही.चार वरिष्ठ अधिकारी प्रतीक्षेत : केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून आलेल्या अप्पर महासंचालक सदानंद दाते यांच्यासह चार आयपीएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दाते व आयजी निखिल गुप्ता २६ फेब्रुवारीपासून तर आयजी बीजेश सिंह १९ जानेवारी आणि उपायुक्त विश्वास पांढरे २७ फेब्रुवारीपासून नियुक्तीविना आहेत.सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीनंतर बदल्याकोरोनामुळे सामान्य प्रशासन विभागाने या वर्षी बदल्यांना स्थगिती दिली आहे. त्यांच्या मान्यतेनंतर आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या केल्या जातील. - अनिल देशमुख, गृहमंत्री 

टॅग्स :मुंबईपोलिस