मुंबई : २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी मिळाली असली, तरीदेखील या धोरणांत काही त्रुटी असून, आवश्यक ठिकाणी बदल करण्यात यावे, अशा आशायाचे निवेदन महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना पाणीहक्क समितीतर्फे देण्यात आले, अशी माहिती समितीचे समन्वयक सीताराम शेलार यांनी दिली.महापालिकेच्या प्रस्तावित धोरणामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या घटकांना दिलासा मिळणार असला, तरी या धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. धोरण अधिक प्रभावी आणि परिणामकारक बनविण्यासाठी काही फेरबदलांची आवश्यकता आहे. आणि जर का हे फेरबदल करण्यात आले नाहीत, तर लाखो मुंबईकरांच्या पदरी निराशाच पडणार आहे, असे समितीचे म्हणणे आहे. महापालिकेने धोरणात ‘गलिच्छ वस्त्या’ असा शब्दप्रयोग केला आहे. त्याऐवजी ‘अघोषित लोकवस्ती’ असा करावा, असे समितीकडून निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जलधोरणात फेरबदलाची मागणी
By admin | Updated: June 19, 2016 02:41 IST