Join us  

दुरुस्ती केलेले शौचालय कोसळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:49 AM

जीवावर बेतले असते : कांदिवलीच्या दामूनगर परिसरातील घटना

मुंबई : कांदिवली पूर्वच्या दामूनगर येथील पंचायत समितीजवळ असलेले सार्वजनिक शौचालय गुरुवारी कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी जवळपास आठवड्यापूर्वी स्थानिक नगरसेवक फंडातून याची दुरुस्ती करण्यात आली होती. कंत्राटदाराने केलेली थूकपट्टी एखाद्याच्या जीवावर बेतली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वॉर्ड क्र. २६ मध्ये मोडणारे हे शौचालय गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी भाजप नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्या नगरसेवक निधीतून दुरुस्त करण्यात आले होते. कंत्राटदाराने यामध्ये फक्त दरवाजे आणि टाइल्स लावल्या; मात्र शौचालयाच्या पोकळ ड्रेनेज लाइनकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रकारघडला. पालिका आर दक्षिण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबतीत लक्ष घालत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षी दामूनगरातील पाटील चाळ येथील सार्वजनिक शौचालय कोसळले होते.स्ट्रक्चरल आॅडिट करा : प्रत्येक पावसाळ्यात कोसळणाऱ्या शौचालयामुळे दामूनगरातील रहिवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. यामुळे पालिका आर दक्षिण विभागाकडून दामूनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर तसेच लहूगड या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :मुंबईपाऊस