Join us

सेंट जॉर्ज रुग्णालयातील थॅलेसेमिया विभागाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:27 IST

मुंबई : राज्यभरातून थॅलेसेमियावर उपचार करण्यास येणाºया रुग्णांचा ओढा लक्षात घेता सेंट जॉर्ज रुग्णालयात नुकताच नवा बदल करण्यात आला.

मुंबई : राज्यभरातून थॅलेसेमियावर उपचार करण्यास येणाºया रुग्णांचा ओढा लक्षात घेता सेंट जॉर्ज रुग्णालयात नुकताच नवा बदल करण्यात आला. या रुग्णालयाच्या थॅलेसेमिया विभागाचे नूतनीकरण करून राज्यभरातील रुग्णांना दिलासा देण्यात आला असून अतिरिक्त नव्या खाटा विभागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाल्या आहेतसेंट जॉर्ज रुग्णालयातील थॅलेसेमिया विभागात मुंबईसह टिटवाळा, भिवंडी, सुरत, मानखुर्द, रत्नागिरी, रायगड येथून रुग्ण येतात. या रुग्णांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी अत्याधुनिक थॅलेसेमिया विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. थिंक फाउंडेशन आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्रयत्नांनी हा विभाग तयार करण्यात आला आहे. सेंट जॉर्ज या रुग्णालयात दररोज जवळपास १० ते १५ रुग्ण येतात. या मुलांना आनंददायक वातावरण मिळावे म्हणून विभागाचे नूतनीकरण करून नवीन दहा खाटा आणण्यात आल्या आहेत. एसी, अद्ययावत शौचालयाची सुविधाही या विभागात करण्यात आली आहे.सध्या या रुग्णालयात १००थॅलेसेमिया लहान रुग्णांवर उपचार सुरू आहेत.या रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमधील दोन अ‍ॅनेस्थेशिया मशीनचेही याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले. शिवाय, आॅर्थोपेडिशिअन्ससाठी लागणाºया सी-आर्म मशीनचेदेखील उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्तदान शिबिर, अवयवदान, नेत्रदान, मोफत संपूर्ण शारीरिक तपासणी, थायरॉइड अशा तपासण्या करण्यात आल्या.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई