ओंकार करंबेळकर / मुंबईहॉर्निमन सर्कल आणि एकूणच दक्षिण मुंबईमधील एक महत्त्वाची वास्तू म्हणून एशियाटिक सोसायटीच्या किंवा टाऊन हॉलच्या वास्तूकडे पाहिले जाते. नुकतेच एशियाटिकमधील काही सभागृहांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. आता या इमारतीच्या ऐतिहासिक पायऱ्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा याच पायऱ्यांवर वाचल्यामुळे या पायऱ्यांना मुंबईच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.२६ नोव्हेंबर १८०४ रोजी सर जेम्स मॅकिन्टोश यांनी स्थापन केलेल्या लिटररी सोसायटी आॅफ बॉम्बेची पहिली बैठक मुंबईमध्ये झाली. त्यानंतर, १८२३ साली लंडनमध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी आॅफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंडची स्थापना करण्यात आली. तर १८३० साली बॉम्बे ब्राँच आॅफ रॉयल एशियाटिक सोसायटी या नावाने त्याची मुंबईमध्ये शाखा सुरू करण्यात आली. १८७३ साली त्यामध्ये बॉम्बे जिआॅग्राफिकल सोसायटी तर १८९६मध्ये अॅँथ्रापॉलॉजिकल सोसायटी आॅफ बॉम्बे विलीन करण्यात आली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटीपासून वेगळे होऊन एशियाटिक सोसायटी आॅफ बॉम्बेची निर्मिती करण्यात आली व २००२ साली त्याचे नाव ‘एशियाटिक सोसायटी आॅफ मुंबई’ करण्यात आले.
एशियाटिकच्या पायऱ्यांचे नूतनीकरण सुरू
By admin | Updated: April 29, 2017 01:47 IST