Join us

पाणीटंचाई दूर करण्यासाठी ५५ विंधन विहीरी

By admin | Updated: May 14, 2014 04:12 IST

पाणीसमस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने कल्याण तालुक्यात ५५ विधंन विहीरी मंजूर केल्या असून यातील चार विहीरी खोदून पाणीपुरवठा विभागाने या कामाला सुरवात केली आहे.

शिवा ठाकूर खडवली - पाणीसमस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने कल्याण तालुक्यात ५५ विधंन विहीरी मंजूर केल्या असून यातील चार विहीरी खोदून पाणीपुरवठा विभागाने या कामाला सुरवात केली आहे.कल्याण तालुक्यात काही गावांमध्ये मोठी पाणी समस्या होती. कधी विजेच्या समस्येने जनतेला पाणी मिळत नव्हते तर कधी नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये तांञिक बिघाड होत असल्याने म्हसरोंडी, चवरे अशा भागात जनतेला पाणी मिळत नव्हते. कडक उन्हाळा आणि अशा उन्हाळयात पाण्यासाठी जनतेची होणारी भंटकती याच सम्स्येची दखल घेवून जिल्हा परिषदने टंचाईग्रस्त भागात एकूण ५५ विंधन विहीरी मंजूर केल्या आहेत़ यापूर्वी याच तालुक्यात एकून ४६ विधंन विहीरी खोदण्यात आल्या आहेत़ त्यातील काही नादुरूस्त झाल्या आहेत. पण काही दुरूस्त करून चालू करण्याचे काम सुद्वा विभागाने केले आहे. यामुळे ग्रामिण भागात पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे़ वीज असो अथवा नसो विंधन विहीरींच्या सहाय्याने जनतेला आपली तहान भागविता येणार आहे. यासंदर्भात सहाय्यक उपअभियंता एम़ जी़आव्हाड यांना विचारले असता, सध्या पाणी समस्या कोठेच नाही तरीही शासनाकडून ५५ विधंन विहीरी मंजूर होवून त्या खोदण्याचे काम तातडीने सरू असल्याचे त्यांनी सांगितले. --------पाण्याची समस्या आज कुठेच नाही अशुद्व दुषित पाणी सुद्वा कुठेच येत नाही. तरीही ५५ विधंन विहीरी खोदण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. त्यातून जनतेला शुद्व पाणी मिळणार आहे. - एऩ जी़ राऊत , उपअभियंता पाणी पुरवठा विभाग कल्याण