Join us  

कोरोना काळातील खर्चाचे आयुक्तांचे विशेष अधिकार काढा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 1:33 AM

स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर : आयुक्तांचा अभिप्राय मागविला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीची बैठक प्रत्यक्षात सुरू होऊन तीन महिने उलटले. तरीही अद्याप कोविड संदर्भातील खर्चाचा निर्णय थेट आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त घेत आहेत. यामुळे स्थायी समितीच्या अधिकारावर गदा येत असल्याने हे विशेष अधिकार रद्द करावे, अशी भाजपने मांडलेली ठरावाची सूचना स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आली. हा ठराव आता आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला. .

कोविड काळातील १६०० कोटींच्या खर्चाचा हिशोब स्थायीने वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दिला नाही. याउलट मार्च २०२१ पर्यंत कोविड खर्चासाठी आणखी चारशे कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे आयुक्तांचे आर्थिक विशेषाधिकार रद्द करण्याची ठरावाची सूचना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी स्थायीच्या बैठकीत मांडली. या सूचनेचे सत्ताधारी सेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन केल्याने एकमताने हा ठराव मंजूर झाला. ऑक्टोबर २०२० पासून समितीच्या बैठका नियमित होत असताना पालिका कोरोनावरील खर्चाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर का सादर करीत नाही? असे  अनेक प्रश्न स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले.

...त्यासाठी बहाल केले हाेते अधिकारअतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांना पाच आणि दहा कोटींपर्यंत खर्च करण्याचा स्थायी समितीने दिलेला अधिकार रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी समितीने मंजूर केला. कोविड काळात समितीच्या बैठका होणार नसल्याने हे अधिकार बहाल करण्यात आले होते.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामुंबई