Join us  

धरणांचे आॅडिट लांबणीवर, महापालिकेला स्मरणपत्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 7:23 AM

केंद्रीय हवामान खात्याने गेल्या शंभर वर्षांतील पावसाची आकडेवारी न दिल्याने मुंबईतील धरणांचे स्ट्रक्चरल आॅडिट लांबणीवरपडले आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही हवामान खात्याने संबंधित माहिती पुरविण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे पालिकेलापुन्हा एकदा ही माहिती देण्यासाठी केंद्राला स्मरणपत्र पाठवावे लागणार आहे.

मुंबई : केंद्रीय हवामान खात्याने गेल्या शंभर वर्षांतील पावसाची आकडेवारी न दिल्याने मुंबईतील धरणांचे स्ट्रक्चरल आॅडिट लांबणीवरपडले आहे. वर्षभरापासून पाठपुरावा करूनही हवामान खात्याने संबंधित माहिती पुरविण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. त्यामुळे पालिकेलापुन्हा एकदा ही माहिती देण्यासाठी केंद्राला स्मरणपत्र पाठवावे लागणार आहे.धरणांच्या सुरक्षेवर काम करणाºया मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना या शासकीय संस्थेने मुंबईतील धरणांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सुचविले होते. त्यानुसार विहार, तुळशी व पवई या तीन तलावांची नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा पुढच्या भागात पूर नियंत्रण अभ्यास महापालिका करणार आहे. या अभ्यासासाठी राज्य सरकारचा नाशिक येथील जल नियोजन विभागही सहकार्य करणार आहे. या विभागाला पालिका १९ लाख ३४ हजार रुपये मोबदला देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.मात्र या अभ्यासासाठी शंभर दिवसांची पावसाची आकडेवारी आवश्यक असते. परंतु गेले वर्षभर पाठपुरावा करूनही दिल्लीतूनही माहिती आलेली नाही. त्यामुळे आयुक्त अजय मेहता आता केंद्रीय हवामान खात्याला स्मरणपत्र पाठविणार असल्याचे सूत्रांकडून समजते.धरणांच्या अभ्यासाची गरजमुंबईतील पवई, तुळशी व विहार ही धरणे शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. पावसाळ्यात धरणात जमा होणारे पाणी आणि सोडण्यात येणाºया पाण्याचा धरणावर काय परिणाम होतो, ते या अभ्यासावरून कळू शकेल. मात्र शंभर वर्षांची आकडेवारी मिळाल्यानंतरच हा अभ्यास शक्य आहे. दरम्यान, नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणीत ही धरणे मजबूत असल्याचे आढळून आले आहेअशी आहे क्षमतामुंबईकरांना पाणी पुरवणारे आणि मुंबईत असणाºया विहार धरणाची पातळी ८०.१२ मीटर्स इतकी आहे. तर तुळशीची पातळी १३९.१७ मीटर्स इतकी असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तर पवईतील पाणी पिण्यासाठी न वापरता ते औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

टॅग्स :मुंबईधरण