Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दीविनायक बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

By admin | Updated: January 28, 2015 00:49 IST

मोहोपाडा येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या श्री सिध्दिविनायक बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने खातेदार, ठेवीदारांत नाराजी दिसून येत होती

मोहोपाडा : मोहोपाडा येथे मुख्य कार्यालय असणाऱ्या श्री सिध्दिविनायक बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने खातेदार, ठेवीदारांत नाराजी दिसून येत होती. मात्र आता एक लाखापर्यत ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा निर्णय डी.आय.सी.जी.सी. कडून घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यासाठी अर्जाचे वाटप मंगळवार २७ जानेवारी पासून सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. ठेवीदारांनी ठेवीच्या मूळ पुराव्यासह व ठेवीच्या मूळ पावत्यांसह खातेदारांना सह्यांसह अर्ज मूळ पासबूक ९ फेब्रुवारीपासून सादर करता येईल. ठेवीदारांना रकमेबाबत आक्षेप असल्यास त्यांनी तसा स्वतंत्र लेखी अर्ज दोन प्रतीत अवसयकांचे नावे सादर करावयाचा आहे.खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर मंजूर रकमेचे वाटप ठेवीदारास रेखांकीत धनादेशाद्वरे बँकेने निश्चित केलेल्या तारखेनुसार करण्यात येईल. (वार्ताहर)