Join us  

रेमडेसिविरचा कोटा केंद्राने केला दुप्पट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 12:31 AM

आता ९ मे पर्यंत देणार राज्याला ८.९ लाख कुपी

यदु जोशी

मुंबई : रेमडेसिविरबाबत एक दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिविरचा कोटा जवळपास दुप्पट केला असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे. त्यामुळे आता ८ लाख ९ हजार कुपी राज्याला मिळणार आहेत. २१ ते ३० एप्रिल दरम्यान ४ लाख ३५ हजार रेमडेसिविर कुपी महाराष्ट्राला दिल्या जातील, असे केंद्र सरकारने कळविले होते. दहा दिवसांत सरासरी ४३ हजार कुपी मिळणे अपेक्षित होते. कोणत्या कंपन्यांनी किती कुपी पुरवायच्या आहेत, याचा कोटाही केंद्र सरकारने निश्चित करून दिला होता. मात्र, १ मे पर्यंत त्यातील ३ लाख ४९ हजार ७० कुपी मिळाल्या. याचा अर्थ ८५ हजार कुपी कमी मिळाल्या.

केंद्र सरकारने राज्याला एक पत्र पाठवून आता एकूण ८ लाख ९ हजार कुपींचा ९ मे पर्यंत पुरवठा केला जाईल असे म्हटले आहे. आतापर्यंत मिळालेल्या कुपींसह हा आकडा असेल. राज्यात रेमडेसिविरच्या गरजेच्या तुलनेत जवळपास ४० टक्के साठा कमी असल्याने प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. दररोज ७० हजार रेमडेसिविरची गरज आहे.

हेटेरो, सिप्ला या दोन कंपन्या राज्याला रेमडेसिविर पुरवण्यात आघाडीवर आहेत. इतर पाच कंपन्यांनी पुरवठा वाढवावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे. रेमडेसिविरचा तुटवडा अजूनही मोठ्या प्रमाणात आहे.- डॉ. राजेंद्र शिंगणे, अन्न व औषधी प्रशासन मंत्री.

रेमडेसिविर दुसऱ्याच रुग्णाला देणाऱ्या हाॅस्पिटलवर गुन्हाज्या रुग्णाच्या नावे रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे, ते त्याला न देता, दुसऱ्याच रुग्णाला दिल्याचे सोलापूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी एका हॉस्पिटलची अचानक तपासणी केल्यावर समोर आले आहे. त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी सांगितले.

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारा डॉक्टर अटकेत

nअकोला/अहमदनगर : राज्यभर रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या प्रकरणी सोमवारी डॉक्टरांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. रेमडेसिविर प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांना ७ मेपर्यंत कोठडी बजावली आहे.

nरेमडेसिविरचा काळाबाजार करताना दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील डॉक्टर सागर सहदेव मेश्राम याच्यासह त्याचे साथीदार असलेले आनंदराम तिवारी, सुमित वाघमारे, कोमल वानखडे यांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा अधिक तपास करीत असताना, निकिता वैरागडे व कार्तिक पवार दोघांना अटक केली. 

रेमडेसिविर कोटा असा२१ एप्रिल - ३९८६९२२ एप्रिल - २८४८५२३ एप्रिल- २९४८२२४ एप्रिल - १९११८२५ एप्रिल - १०८००२६ एप्रिल - २७०९६२७ एप्रिल - ४४३१८२८ एप्रिल - १६२००२९ एप्रिल - १३६१७३० एप्रिल - २२४९५१ मे - १९९६.

टॅग्स :रेमडेसिवीरकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस