Join us

दहिसर पोस्ट ऑफिस परत स्थलांतरित करा; 'उबाठा'ने घेतली वरिष्ठ पोस्ट अधिक्षकांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 1, 2024 18:46 IST

दहिसर (पूर्व) शैलेंद्र नगर येथे केंद्र सरकारच्या स्वतः च्या इमारतीत अनेक वर्षांपासून जुने पोस्ट ऑफीस होते.

मुंबई: दहिसर (पूर्व) शैलेंद्र नगर येथे केंद्र सरकारच्या स्वतः च्या इमारतीत अनेक वर्षांपासून जुने पोस्ट ऑफीस होते. येथील इमारत धोकादायक झाल्याने बोरिवली (पश्चिम),प्रेम नगर,मंडपेश्वर इंडस्ट्रीज येथे सदर पोस्ट ऑफीस स्थलांतरीत केल्याने पेन्शनर,जेष्ठ नागरिक व महिला बचत गट यांची मोठी गैरसोय होते.

याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हर्षद कारकर यांनी पाठपुरावा केला.याबाबत विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्या समवेत वरिष्ठ पोस्ट अधीक्षक  रुपेश सोनावले यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यावेळी विभागप्रमुख उदेश पाटेकर,माजी नगरसेवक हर्षद कारकर,उपविभागसंघटक दिक्षा कारकर व शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक, महिलांची होत असलेल्या गैरसोयीबद्दल त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तातडीने पूर्वी असलेल्या पोस्ट ऑफिसच्या आसपासच्या ठिकाणी दहिसर पोस्ट स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी रुपेश सोनावले यांच्याकडेकेल्याचे कारकर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईदहिसर