Join us

अनुसूचित जमातीच्या दाखल्यावर शासकीय नोकरीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनुसूचित जमातीच्या दाखल्यावर शासकीय नोकरीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन दिलासा देणार, असे ठोस आश्वासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनुसूचित जमातीच्या दाखल्यावर शासकीय नोकरीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन दिलासा देणार, असे ठोस आश्वासन राज्याचे परिवहन व संसदीय मंत्री ॲड. अनिल परब कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधान परिषद आमदार रमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाला दिले.

यावर सखोल चर्चा करून येत्या दोन ते तीन दिवसात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक करून या विषयावर मार्ग काढून सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन मंत्रीमहोदयांनी या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ॲड. अनिल परब यांच्याबरोबर काल बैठक संपन्न झाली.

प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या दाखल्यावर महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर २१ नोव्हेंबर २०१९च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांना अधिसंख्य पदावर रुजू केले आहे. त्यांना ११ महिन्याच्या कालावधीची मर्यादा/नियम न ठेवता त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कायम करण्याकरिता आपण सहकार्य करावे, अशी आग्रही मागणी आमदार रमेश पाटील व कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने अनिल परब यांना केली.

सदरच्या शिष्टमंडळात कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरी, शिवसेना उपविभागप्रमुख चिंतामणी निवटे, कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष ॲड. चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

--------------------------------------