मुंबई : पालिकेने पुरविलेल्या गणवेशाऐवजी परस्पर खरेदी करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे दोन वार्षिक वेतनवाढ कापण्याच्या निर्णयाला अखेर प्रशासनाने स्थगिती दिली आहे़ यामुळे अडीच हजार जवान व अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे़ महापौर दलानात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे़पालिकेमार्फत अडीच हजार जवान व अधिकाऱ्यांना गणवेश पुरविण्यात येतो़ यासाठी नेमलेला ठेकेदार चांगल्या दर्जाचे कपडे देत नसल्याची जवानांची तक्रार आहे़ परंतु याबाबत तक्रार करण्याऐवजी जवान त्या पैशातून परस्पर गणवेश खरेदी करीत होते, असा ठपका २०१२ मध्ये ठेवण्यात आला़ याप्रकरणी जवानांचे दोन वार्षिक वेतनवाढ कापण्याची शिक्षा प्रशासनाने सुनावली होती़ याप्रकरणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना यांची महापौर स्रेहल आंबेकर यांच्याकडे दाद मागितली होती़ महापौर दालनात झालेल्या या बैठकीत आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांचा समावेश होता़ चांगल्या दर्जाचे गणवेश मिळण्यासाठी जवान परस्पर खरेदी करीत होते, असा युक्तिवाद मांडण्यात आला़ त्यामुळे या कारवाईवर फेरविचार करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली़ (प्रतिनिधी)
अग्निशमन दलाच्या जवानांना दिलासा
By admin | Updated: July 5, 2015 03:34 IST