Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमूलसह रिलायन्सला लुटले, तिघांना अटक

By admin | Updated: January 16, 2016 02:00 IST

अमूल घीसह रिलायन्सच्या सेल्स कार्यालयात दूरध्वनीवरून लाखो रुपयांची आॅर्डर देत त्याचे पैसे सेल्सबॉयला देण्याऐवजी मिळालेल्या साहित्यासह पसार होणाऱ्या तीन जणांना

मुंबई : अमूल घीसह रिलायन्सच्या सेल्स कार्यालयात दूरध्वनीवरून लाखो रुपयांची आॅर्डर देत त्याचे पैसे सेल्सबॉयला देण्याऐवजी मिळालेल्या साहित्यासह पसार होणाऱ्या तीन जणांना खेरवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.दोन्ही कंपन्यांनी आॅर्डरनुसार सेल्सबॉय आॅर्डरच्या ठिकाणी पाठवून दिले. या वेळी दोन आरोपींनी सेल्सबॉयला पैसे देण्याच्या बहाण्याने खेरवाडीतल्या गर्दीच्या ठिकाणी नेले आणि पळ काढला; तर तिसऱ्या आरोपीने साहित्य एका टेम्पोमध्ये भरत पळ काढला. या प्रकरणी दोन्ही कंपन्यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, पोलिसांनी मोबाइल लोकेशन टे्रस करत आरोपींना पकडले. (प्रतिनिधी)