कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे चालविल्या जाणा-या कल्याण-वाशी, कोकणभुवन, आणि पनवेल या बसेसचे सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले असून १ एप्रिल पासून याची अंमलबजावणी होणार आहे. कल्याणहून वाशीला जाण्यासाठी पहिली बस पहाटे ४.४० वाजता उपलब्ध होणार असून शेवटची बस रात्रौ ११ ला कल्याणसाठी सुटेल.तर वाशीहून कल्याणला येण्यासाठी पहिली बस सकाळी ६.०५ तर रात्रौ १२ वाजून ४० मिनिटांनी शेवटची बस सुटणार आहे. ३० मिनिटांच्या फरकाने या बस उपलब्ध होणार आहेत. कल्याणहून कोकणभुवनला पहिली बस सकाळी ६.३० ला सोडण्यात येणार असून शेवटची बस रात्रौ ९ ला सुटेल. कल्याणला येण्यासाठी कोकणभुवन येथून पहिली बस सकाळी ८ वाजता तर अखेरची बस रात्रौ १०.३५ ला सुटणार आहे. तसेच कल्याणहून पनवेलसाठी पहिली बस सकाळी ६.४५ वाजता तर शेवटची बस रात्रौ १०.०५ ला सुटेल. पनवेलवरून कल्याणसाठी पहिली बस सकाळी ८.२० ला तर शेवटची बस रात्रौ ११.४५ ला सुटणार आहे. बसेसच्या देखभाल दुरूस्तीसाठी वेळ मिळावा या अनुषंगाने हे नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. कल्याणप्रमाणे डोंबिवलीचे वेळापत्रक लवकरच बदलले जाणार असल्याचे केडीएमटी महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
केडीएमटीचे सुधारित वेळापत्रक जारी
By admin | Updated: March 30, 2015 23:37 IST