Join us
Daily Top 2Weekly Top 5

१०० हून अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:26 IST

दक्षिण मुंबईतील देहविक्रीसाठी ओळखल्या जाणा-या कामाठीपुरा परिसरात मुंबई पोलिसांनी मोठी छापेमारी करीत १०० हून अधिक देहविक्री करणा-या महिलांची सुटका केली.

मुंबई : दक्षिण मुंबईतील देहविक्रीसाठी ओळखल्या जाणा-या कामाठीपुरा परिसरात मुंबई पोलिसांनी मोठी छापेमारी करीत १०० हून अधिक देहविक्री करणा-या महिलांची सुटका केली. तसेच दलालांना अटक केली आहे. मध्यरात्री २ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत छापे मारून देहविक्री करणाºया महिलांची सुटका केली आणि ६ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत कामाठीपुरा परिसरातील सिम्प्लेक्स इमारतीत छापेमारी करण्यात आली. अवैध देहविक्रीचा धंदा चालविणाºया महिलांना आणि दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले़