Join us
Daily Top 2Weekly Top 5

कतलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच गायींची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:05 IST

वांद्रेतून एकाला अटक, दोघे पसारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गायीला कतलीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलिसांनी वांद्रे परिसरातून ...

वांद्रेतून एकाला अटक, दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गायीला कतलीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलिसांनी वांद्रे परिसरातून अटक केली, तर त्याच्या दोन साथीदारांनी घटनास्थळाहून पळ काढला. एका प्राणीप्रेमीने केलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी ही कारवाई करून पाच गायींची सुटका केली.

नदीम कुरेशी (३८), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, तर त्याचे पसार झालेले साथीदार रफिक कुरेशी आणि चांद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्राणीप्रेमीने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. वांद्रे येथील गरीबनगर परिसरात कतलीसाठी गायींना डांबून ठेवले हाेते. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाच गायींची सुटका केली. येथून नदीमला ताब्यात घेतले, तर त्याच्या पसार झालेल्या साथीदारांचा पाेलीस शाेध घेत आहेत.

..........................