Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मण ढोबळे यांना तूर्त दिलासा

By admin | Updated: October 1, 2014 02:31 IST

बोरीवली येथील एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना येत्या 28 ऑक्टोबर्पयत अटक न करण्याचे अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिल़े

मुंबई :  बोरीवली येथील एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना येत्या 28 ऑक्टोबर्पयत अटक न करण्याचे अंतरिम आदेश सत्र न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना दिल़े
या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी ढोबळे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आह़े मुळात या महिलेवर पैसे घेऊन महाविद्यालयीन प्रवेश न दिल्याचे आरोप आहेत़ तसेच बलात्कार केव्हा केला याचा तपशील, ही महिला योग्य प्रकारे देत नाही़ तेव्हा ही तक्रारच चुकीची असून यात अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती ढोबळे यांनी अर्जात केली होती.(प्रतिनिधी)