डोंबिवली : दूध कंपन्या आणि वितरक यांच्यात कमिशनवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा निघत नसल्याने ठाण्यासह कल्याणमध्येही ब्रॅण्डेड कंपन्यांचे दू्ध विक्री न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध वितरक व्यापारी सेवा संघाने घेतला आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, नवी मुंबईत नागरिकांना बुधवारी दूध टंचाईला सामारे जावे लागणार आहे.अत्यल्प कमिशन देत असल्याने विक्रेत्यांनी एमआरपीवर एक ते दोन रुपये जादा आकारण्यास सुरुवात केली होती. या पिळवणुकीविरोधात ग्राहकांनी आवाज उठवला. त्यानंतर वैध मापनशास्त्र विभागाने एमआरपीपेक्षा जास्त दराने दूध विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला. त्यावर दूध विक्रेत्यांनी अखेरचा पर्याय म्हणून ब्रॅण्डेड दूध कंपन्यांच्या दुधावर बहिष्कार टाकला. त्यामुळे ठाणेकरांना मध्यंतरी या पाच कंपन्यांचे दूधच मिळेनासे झाले होते. हा तिढा सोडवण्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पुढील १५ दिवसांत दूध विक्रेत्यांचे कमिशन वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र महानंद वगळता इतर ४ ब्रॅण्डेड कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा बहिष्कार घालण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याचे संघाचे अध्यक्ष बाबू बैनानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्एप्रिल महिन्यात विक्रेत्यांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर महानंदने २ रुपये आणि गोकूळ कंपनीने १ रुपयांनी कमिशन वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महानंदने दुधाच्या किमतीत २ रुपये वाढ करून कमिशन वाढ दिली. मात्र गोकूळने केवळ १ रुपया वाढ देण्याचे मान्य केले. च्ती पुरेशी नसून किमान २ रुपये वाढ देण्याची विक्रेत्यांची मागणी आहे. परिणामी गोकूळच्या विक्रीवरही बहिष्कार टाकणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.च्दूध विक्रेत्यांची नोंद ठेवून त्यांना ठरावीक टक्क्यांमध्ये कमिशन दिल्यास या प्रश्नावर कायमचा तोडगा निघेल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र दूध कंपन्यांच्या दरबारी मुख्य वितरक आणि ग्राहक अशा दोनच घटकांची नोंद आहे. च्विक्रेत्यांना अद्याप कोणत्याही कंपनीने अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे काही रुपयांनी दरवाढ करून विक्रेत्यांना कमिशन दिल्याने हा प्रश्न तात्पुरता सुटणार आहे.ठाणे : विक्रेत्यांना तुटपुंजे कमिशन देऊन नफ्यापोटी करोडो रुपयांची ‘मलई’ खाणाऱ्या तथाकथित नामांकित दूध कंपन्यांवर विक्रेत्यांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकूळ, अमूल आणि मदर डेअरी या तिन्ही कंपन्यांच्या दुधापासून ठाणेकरांना वंचित राहावे लागणार आहे. तर महानंद आणि गोकूळने किमती वाढविल्यामुळे विक्रेते आणि कंपन्यांच्या वादाचा फटका ग्राहकांना बसला आहे.अमूल, वारणा, गोकूळ, महानंद आणि मदर डेअरी या पाचही कंपन्यांनी विक्रेत्यांना तुटपुंजे कमिशन दिल्याने महिनाभरापूर्वी आधी ठाण्यातून नंतर मुंबईसह पनवेल, डोंबिवलीत त्यांच्या विक्रीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर १५ दिवसांची मुदत मागून या कंपन्यानी विक्रेत्यांशी बोलणी सुरू केली. त्यामध्ये ‘महानंद’ संघाने लीटरमागे दोन रुपयांनी वाढ करून त्यातूनच विक्रेत्यांना सात टक्के कमिशन देण्याचे मान्य केले. तर गोकूळने गायीच्या दुधात लीटरमागे एक रुपया वाढविल्याने त्याची किंमत ३८ वरून ३९ रुपये झाली. म्हशीचे दूधही ५० वरून ५१ रुपये केली आहे. कमिशनबाबत मात्र त्यांनी तोंडावर बोट ठेवले.वारणाचीही किंमत ५१ वरून ५२ रुपये होण्याचे संकेत आहेत. किमतीत वाढ न करता कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीकडे कंपन्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्राहक आणि विक्रेत्यांमध्येही संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत किरकोळ किमतीवर विक्रेत्यांना १० टक्के कमिशन दिले जात नाही, तोपर्यंत दूध विक्र ी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ठाणे शहर दूध विक्रेते कल्याणकारी संघाचे सह सचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली.कमिशन वाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र महानंद वगळता इतर ४ ब्रॅण्डेड कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने या कंपन्यांच्या दुधावर बुधवारपासून पुन्हा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. - बाबू बैनानी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध वितरक व्यापारी सेवा संघ, कल्याण मुंबईवरची कोंडी तूर्त टळलीयाआधी मुंबईतील दूध विक्रेत्यांनीही मंगळवारपासून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सकारात्मक चर्चेच्या जोरावर ३० मेपर्यंत बहिष्कार पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबईतील विक्रेत्यांनी घेतला आहे. यामुळे मुंबईतील दूधपुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही.
जादा कमिशनसाठी पुन्हा ऊत
By admin | Updated: May 20, 2015 02:01 IST