Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या मच्छीमार नौकांची नोंदणी लवकर सुरू होणार

By admin | Updated: January 6, 2015 01:32 IST

आॅगस्टपासून बंद असलेली नव्या बोटींची, खरेदी-विक्र ीची तसेच वारसांच्या बोटींची नोंदणी लवकर सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली अखेर सुरू झाल्या आहेत.

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय खाते आणि बंदर खात्याच्या घोळामुळे गेल्या आॅगस्टपासून बंद असलेली नव्या बोटींची, खरेदी-विक्र ीची तसेच वारसांच्या बोटींची नोंदणी लवकर सुरू करण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली अखेर सुरू झाल्या आहेत. ‘लोकमत’ने ३० डिसेंबरच्या अंकात ‘नव्या मच्छीमार नौकांच्या बांधणीला लागला ब्रेक’ हे वृत्त दिले होते. या बातमीच्या दणक्यामुळे सहा महिन्यांनंतर शासकीय पातळीवर यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यप्रमुख रामदास संधे यांनी ही माहिती दिली.गेल्या आॅगस्टपासून या सरकारी घोळामुळे लाखोंचे कर्ज घेऊन बोटी बांधणारी मासेमार मंडळी तसेच बोटींची खरेदी-विक्रीदेखील ठप्प झाली होती. कर्जाच्या व्याजाचे हप्ते वाढत असल्याने मच्छीमार हवालदिल झाल्याचेही संधे यांनी सांगितले. ते म्हणाले, की या बातमीची दखल मत्स्यव्यवसाय आयुक्त श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली असून, लवकरच या बोटींच्या नोंदणीला सुरुवात करणार असल्याचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त चौगुले यांनी सांगितले.